मुंबई -विंडीज दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आले आहे. तत्पूर्वी, अश्विन एका घटनेसाठी सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
TNPL : फिरकीपटू अश्विनने टाकलेला हा 'भन्नाट' चेंडू पाहिलात का? - mysterious delivery in tnpl
डिंडीगुल ड्रॅगंसकडून खेळत असताना अश्विनने मदुरै पँथर्सविरुद्धच्या सामन्यात विचित्र पद्धतीने चेंडू टाकला.
भारताचा हा फिरकीपटू सध्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. डिंडीगुल ड्रॅगंसकडून खेळत असताना त्याने मदुरै पँथर्सविरुद्धच्या सामन्यात विचित्र पद्धतीने चेंडू टाकला. त्याने हा टाकलेला चेंडू सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अश्विनने हा चेंडू टाकताना तो शेवटपर्यंत मागे लपवला आणि डाव्या हाताने कोणतीही हालचाल न करता तो तसाच अलगद टाकला.
या दोन संघातील सामन्यादरम्यान अश्विनची 'मिस्ट्री' गोलंदाजी बघताना फलंदाज पूर्णपणे चक्रावला आणि मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. या सामन्यात डिंडीगुल ड्रॅगंसने मदुरै पँथर्सचा पराभव केला. डिंडीगुल ड्रॅगंसने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावत 182 धावा केल्या. त्यांच्या प्रत्यूत्तरात मदुरै पँथर्सने 9 गडी गमावत 152 धावा केल्या. अश्विनने या सामन्यात 4 षटकांमध्ये 16 धावा देत 3 बळी घेतले आहेत.