नवी दिल्ली - भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आपला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो 2019च्या विश्वकरंडक स्पर्धेतील असून आजच्या दिवशी भारताला स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते.
"आम्ही खूप प्रयत्न केले, पण...'', जडेजाने शेअर केली वाईट आठवण - रवींद्र जडेजा लेटेस्ट न्यूज
गेल्या वर्षी याच दिवशी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले. जडेजाने याच सामन्याचा फोटो केला आहे. "आम्ही खूप प्रयत्न केले, परंतू कमी पडलो. सर्वात वाईट दिवसांपैकी एक'', असे जडेजाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 गडी गमावत 239 धावा केल्या. त्यानंतर भारताला त्यांनी 221 धावांवर बाद केले. त्या सामन्यात जडेजाने 77 धावांची शानदार खेळी केली. महेंद्रसिंह धोनीबरोबरच्या भागीदारीत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलो. मात्र, धोनी धावबाद झाला आणि भारताच्या सर्व आशा मावळल्या. या सामन्यानंतर धोनीने एकही सामना खेळला नाही. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडचा संघ विजयी ठरला.