नागपूर - दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत २-० ने मोठी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रविंद्र जाडेजाने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
जाडेजाने वनडेत २१ धावा केल्या तर १ विकेटही बाद केला. या खेळीसह जाडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या २ हजार धावा पूर्ण केल्यात, तसेच त्याच्या खात्यात १७१ विकेटही जमा आहेत. भारताकडून खेळताना २ हजार धावा आणि १५० पेक्षा अधिक विकेट बाद करणारा जाडेजा हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी हा कारनामा फक्त कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांनाच करता आला होता.भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यामुळे हार्दिकच्या जागी एकदिवसीय मालिकेसाठी रवींद्र जाडेजाला संघात स्थान देण्यात आले होते.