विशाखापट्टणम -सध्या भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवसअखेर डी कॉक आणि एल्गारच्या खेळीमुळे आफ्रिका संघाने भारताला दमदार प्रत्युत्तर दिले. आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना हैराण केले असले तरी, भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने या सामन्यात एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा -कपिल देव यांच्यापाठोपाठ अंशुमान गायकवाड यांचाही राजीनामा
या सामन्यात डावखुरा गोलंदाज म्हणून फिरकीपटू रविंद्र जडेजाने कसोटीतील सर्वात जलद २०० बळी मिळवण्याची किमया केली. दीडशतकवीर डीन एल्गारला बाद करत त्याने हा विक्रम रचला. या विक्रमामध्ये जडेजाने श्रीलंकेच्या रंगना हेराथला मागे टाकले. त्याने ४७ कसोटी सामन्यांत २०० बळी मिळवले होते. तर, जडेजाने ४४ सामन्यांतच २०० बळी मिळवले आहेत. या दोन खेळाडूनंतर, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनने ४९ कसोटी सामन्यांत २०० बळी मिळवले आहेत.