मुंबई -भारताचा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये गतवर्षी पंजाबकडून खेळलेला रवीचंद्रन अश्विन आगामी मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याची अश्विनच्या बदल्यात पंजाबने मागणी केली होती, पण दिल्लीने ती मान्य केली नाही.
हेही वाचा -अजिंक्य रहाणेच्या मुलीचं झालं बारसं, नाव आहे.....
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला दिल्लीने अश्विनच्या बदल्यात एक कोटी रुपये आणि अष्टपैलू खेळा़डू जगदीश सुचितला देण्याचे मान्य केले आहे. 'प्रदीर्घ चर्चेनंतर आता सर्व खुश आहेत. अश्विनला पुढील हंगांमासाठी शुभेच्छा', असे पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी सांगितले आहे.
अश्विन यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता. त्याने गतसाली पंजाबकडून २८ सामन्यात २५ विकेट्स घेतल्या आहेत. पंजाबने यंदा त्यांचा प्रशिक्षकही बदलला आहे. अनिल कुंबळे याच्यापूर्वी माईक हेसन, ब्रॅड हॉज, वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांनी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते.