महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

२०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी धोनीने मला आत्मविश्वास दिला - अश्विन - ms dhoni and ashwin latest news

अश्विन म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यादरम्यान धोनी माझ्याजवळ आला. मला एकही विकेट मिळाली नाही. तरीही मी खूप चांगली गोलंदाजी करत असल्याचे त्याने मला सांगितले.” २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते.

Ravichandran ashwin said ms dhoni boosts confidence in champions trophy 2013
२०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी धोनीने मला आत्मविश्वास दिला - अश्विन

By

Published : May 17, 2020, 11:17 AM IST

मुंबई - भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने माइंड मास्टर्स शोमध्ये मानसिक कौशल्यावर आपले विचार मांडले. यासाठी त्याने २०११ ची विश्वकरंडक स्पर्धा आणि २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख केला. अश्विन म्हणाला, “२०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी धोनीने मला आत्मविश्वास दिला.”

अश्विन म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यादरम्यान धोनी माझ्याजवळ आला. मला एकही विकेट मिळाली नाही. तरीही मी खूप चांगली गोलंदाजी करत असल्याचे त्याने मला सांगितले.” २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते.

धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सद्या कोरोनाचे सावट आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल विसरा, असे सूचक संकेत दिले आहेत. जर आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास धोनीचे भवितव्य अंधारात आहे. आजही धोनीच्या निवृत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. पण धोनीने अद्यापही याविषयी कोणतेही संकेत दिलेले नाही.

धोनीव्यतिरिक्त सचिननेही आपल्याला मदत केल्याचे अश्विनने म्हटले आहे. तो म्हणाला, “सचिन माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितले, तू एखाद्या सामन्यात गोलंदाजी करतोस तशी नेट्समध्ये गोलंदाजी करत आहेस.’

ABOUT THE AUTHOR

...view details