मुंबई -कोरोना व्हायरसने सध्या जगाच्या गतीला लगाम घातला आहे. या संकटामुळे जगभरातील लोकांना घरी 'लॉकडाउन'मध्ये राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर, अनेक नामवंत व्यक्ती आरोग्याशी संबंधित आवश्यक प्रोटोकॉलचे अनुसरन करण्यास लोकांना सांगत आहेत. या अभियानात भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही मागे राहिलेला नाही. कोरोनाचा विषय गंभीरतेने घेण्यासाठी अश्विनने ट्विटरवरून आपले नाव बदलले आहे.
हेही वाचा -कोलकाता 'लॉकडाऊन' पाहून दादा झाला भावूक
मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर अश्विनचे नाव 'रविचंद्रन अश्विन' असे होते. पण आता त्याने त्याचे नाव बदलून 'लेट्स स्टे इंडुर्स इंडिया' असे केले आहे. सध्याच्या परिस्थितीत लोकांना घरी रहाण्याचे महत्त्व समजण्यासाठी अश्विनने ही शक्कल लढवली आहे.
कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे जमावबंदीचे आदेश देण्यात आले. पण लोकांनी जमावबंदीच्या नियमांची पायमल्ली करत रस्त्यावर फिरणे सुरूच ठेवले. तेव्हा महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली सरकारने संचारबंदी लागू केली. देशात कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पार पोहोचला आहे तर महाराष्ट्रात १०६ कोरोनाचे रुग्ण आहेत.