महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फिरकीपटू अश्विनचा मोठा प्रताप!..कसोटीत केला 'हा' खास विक्रम - ashwin and muralitharan record

आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या ब्रायनला बाद करत अश्विनने मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली. अश्विन हा भारताकडून सर्वात जलद ३५० कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. ३३ वर्षीय अश्विनने ६६ कसोटी सामन्यात हा विक्रम केला.

फिरकीपटू अश्विनचा मोठा प्रताप!..कसोटीत केला 'हा' खास विक्रम

By

Published : Oct 6, 2019, 11:42 AM IST

विशाखापट्टणम -भारत आणि आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीमध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विने दमदार पुनरागमन केले. त्याने आफ्रिकेच्या पहिल्या डावाला सुरुंग लावत ७ गडी बाद केले. पाचव्या दिवशी त्याने अजून एका फलंदाजाला बाद करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

हेही वाचा-चाहत्यांनी पाठवलेले फोटो पाहून फेडररही अवाक्!

आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या ब्रायनला बाद करत अश्विनने मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली. अश्विन हा भारताकडून सर्वात जलद ३५० कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. ३३ वर्षीय अश्विनने ६६ कसोटी सामन्यात हा विक्रम केला.

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३५० बळी मिळवण्याचा पराक्रम श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर होता. आता अश्विनने मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या विक्रमासोबत अश्विनने भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनाही मागे टाकले आहे. कुंबळेने ७७ सामन्यांमध्ये ३५० बळी घेतले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details