चेन्नई - रविचंद्रन अश्विन याने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान, एका विक्रमाची नोंद केली. त्याने रोरी बर्न्सची विकेट डावाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली. अशा कारनामा करणारा तो भारताचा पहिलाच फिरकीपटू गोलंदाज ठरला आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पहिले षटक अश्विनने फेकले. यातील पहिल्या चेंडूवर त्याने रोरी बर्न्सला बाद केलं. झपकन वळलेला चेंडू बर्न्सला काही कळायच्या आत बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये उभारलेल्या अजिंक्य रहाणेच्या हातात जाऊन विसावला. अश्विन कसोटीच्या कोणत्याही डावात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा भारताचा पहिला फिरकीपटू गोलंदाज ठरला आहे.