नवी दिल्ली - भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावर रवी शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी, न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन, यांच्यासह 2007 सालच्या टी-20 विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले होते. मात्र, रवी शास्त्री यांनी मुलाखतीत बाजी मारली.
रवी शास्त्रींनी 'हे' उत्तर देऊन सहा जणांच्या लढतीत मारली बाजी - भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री
आपले ध्येय अजूनही यशस्वी पूर्ण झालेली नाही. तर विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. आगामी २०२० आणि २०२१ साली आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. हे विश्वचषक माझ्या डोळ्यापुढे आहेत, असे रवी शास्त्री यांनी सल्लागार समितीला सांगितल्याने त्यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनूसार, रवी शास्त्री सद्या भारतीय संघासोबत वेस्ट दौऱ्यावर आहेत. यामुळे त्यांची मुलाखत स्काईपव्दारे व्हिडिओ कॉन्फरन्सने घेण्यात आली. या मुलाखतीत शास्त्री यांनी निवड सल्लागार समितीला सांगितले की, आपले ध्येय अजूनही यशस्वी पूर्ण झालेले नाही. तर विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. आगामी २०२० आणि २०२१ साली आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. हे विश्वचषक माझ्या डोळ्यापुढे आहेत.
सल्लागार समितीला शास्त्री यांनी भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा विश्वास बोलून दाखवला. यामुळे या पदासाठी सहा जणांमध्ये रंगलेल्या चुरसीत शास्त्री यांनी बाजी मारली. दरम्यान रवी शास्त्री २०२१ सालापर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहतील.