महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

प्रशिक्षक रवी शास्त्रींना घसघशीत पगारवाढ, मिळणार 'इतके' कोटी - Ravi Shastri

बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री यांच्या पगारामध्ये तब्बल २० टक्क्यांनी वाढ देण्यात आली असून शास्त्री यांना वर्षाकाठी ९.५ ते १० कोटी रुपये वेतन देण्यात येणार आहे.

प्रशिक्षक रवी शास्त्रींना घसघशीत पगारवाढ, मिळणार 'इतके' कोटी

By

Published : Sep 9, 2019, 8:49 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीने, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड केली. या निवडीनंतर रवी शास्त्री यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री यांच्या पगारामध्ये तब्बल २० टक्क्यांनी वाढ देण्यात आली असून शास्त्री यांना वर्षाकाठी ९.५ ते १० कोटी रुपये वेतन देण्यात येणार आहे.

हेही वाचा -'धोनीला, सन्मानपूर्वक निवृत्ती मिळायला हवी, तो त्याचा हक्क आहे'

यापूर्वी शास्त्री यांना वार्षिक ८ कोटी रुपये, एवढे वेतन देण्यात येत होते. पण आता यामध्ये २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या वेतनातही वाढ करण्यात येणार आहे. या वाढीनुसार अरुण यांना वर्षिक ३.५ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. शास्त्री २०२१ सालापर्यंत भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील.

हेही वाचा -बुमराह मैदानावर जादू घडवू शकतो, आफ्रिकन गोलंदाजाने केली स्तुती

दरम्यान, रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली. विंडीज विरुध्द भारताने तिन्ही प्रकारात एकही पराभव न स्वीकारता मालिका जिंकल्या. शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला मात्र, विश्वकरंडक जिंकता आलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details