महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 6, 2019, 8:56 PM IST

ETV Bharat / sports

टीम इंडियाला शास्त्रीगुरुजीच शिकवणार, क्रिकेट सल्लागार समितीने दिले संकेत

कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची समिती भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक निवडणार आहे.

टीम इंडियाला शास्त्रीगुरुजीच शिकवणार, क्रिकेट सल्लागार समितीने दिले संकेत

नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी भारतीय व्यक्तीच नेमण्यात येणार असा संकेत क्रिकेट सल्लागार समितीने दिला आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांचीच टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून फेरनिवड होणार अशी शक्यता सर्वत्र वर्तवण्यात येत आहे.

टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या एका सदस्याने याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'आम्ही परदेशी प्रशिक्षक निवडण्याचा विचार केला नाही. जर, गॅरी कस्टर्नसारख्या महान खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केला आहे, तर अशा व्यक्तींचा आम्ही विचार करु. पण, भारतीय प्रशिक्षक हीच आमची पहिली खरी पसंती राहील.'

या सदस्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली असल्यामुळे सध्याच्या घडीला तेच पुनरागमन करु शकतात असे म्हटले जात आहे. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची समिती भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक निवडणार आहे.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी अर्ज केला आहे. मूडी यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा खूप अनुभव आहे. न्यूझीलंडचे माजी आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनीही अर्ज केला आहे. भारतीयांमध्ये रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत यांनीही आपली दावेदारी सांगितली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details