महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

..तर, शास्त्री मुर्खांच्या राज्यात जगत आहेत, गांगुलीचे वक्तव्य - रवी शास्त्री लेटेस्ट न्यूज

येत्या २३ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत सौरव गांगुली पदभार स्विकारणार आहे. या संदर्भात त्याने पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा एका प्रश्नाचे गांगुलीने मजेशीर उत्तर दिले. एका पत्रकाराने ‘तुम्ही रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केलीत का?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा पत्रकारांना गांगुलीने ‘आता त्यांनी काय केलं?’ असे गमतीशीर उत्तर दिले.

..तर, शास्त्री मुर्खांच्या राज्यात जगत आहेत, गांगुलीचे वक्तव्य

By

Published : Oct 18, 2019, 5:48 PM IST

कोलकाता -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड करण्यात आली. या निवडीनंतर, गांगुलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी 'रवी शास्त्री यांना नाकारून टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेंची निवड करण्यामागे माझा हात होता असे जर शास्त्रींना वाटत असेल तर ते मुर्खांच्या राज्यात जगत आहेत', असे वक्तव्य गांगुलीने केले आहे.

हेही वाचा -'धोनी नही तो फॅन्स नही', रांचीतील कसोटीसाठी प्रेक्षकसंख्या घटली

येत्या २३ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत सौरव गांगुली पदभार स्वीकारणार आहे. या संदर्भात त्याने पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा एका प्रश्नाचे गांगुलीने मजेशीर उत्तर दिले. एका पत्रकाराने ‘तुम्ही रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केलीत का?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा पत्रकारांना गांगुलीने ‘आता त्यांनी काय केलं?’ असे गमतीशीर उत्तर दिले.

रविवारी बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत गांगुलीची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर, सचिवपदी गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 'या नियुक्तीमुळे मी आनंदी आहे. बीसीसीआयची प्रतिमा मलिन झाली असल्याने माझ्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची ही योग्य संधी आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भारत हा शक्तिशाली देश आहे. तुम्ही जरी बिनविरोध निवडले गेले असाल तरी, एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी मोठी गोष्ट आहे', असे गांगुलीने नियुक्ती झाल्यावर म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details