नवी दिल्ली -न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताला पहिल्या कसोटीत १० गड्यांनी तर दुसऱ्या कसोटीत ७ गड्यांनी मात खावी लागली. या पराभवानंतर, आणि संघाच्या कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करण्यात येत आहे. 'आधी त्या आळशी रवी शास्त्रींना पदावरून काढण्यात यावे', अशी मागणी नेटकरी करत आहेत.
'आळशी रवी शास्त्रीला लगेच हाकला', नेटकरी भडकले - रवी शास्त्री पुन्हा ट्रोल न्यूज
एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकाही भारतीय संघाने गमावली. विदेशी खेळपट्ट्यांवर भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. शास्त्री यांना काढून टाका, त्यांच्या जागी भारताला एखादा 'फिट' प्रशिक्षक गरजेचा आहे, अशी मते ट्विटरवर मांडण्यात आली आहेत.
'आळशी रवी शास्त्रीला लगेच हाकला', नेटकरी भडकले
हेही वाचा -"जुन्या सवयीमुळे विराट कोहली फ्लॉप"
एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकाही भारतीय संघाने गमावली. विदेशी खेळपट्ट्यांवर भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मात्र, या सर्वांमध्ये संघाचा कर्णधार विराट कोहली केंद्रबिंदू ठरला. खराब फॉर्मशी झगडत असणाऱ्या विराटला कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी करता आली नाही. शास्त्री यांना काढून टाका, त्यांच्या जागी भारताला एखादा 'फिट' प्रशिक्षक गरजेचा आहे, अशी मते ट्विटरवर मांडण्यात आली आहेत.