रत्नागिरी- कोल्हापूरच्या किर्लोस्करवाडीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघातील अविराज गावडे याने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. त्याने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात १५ गडी बाद केले आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाने चांगली कामगिरी केली आहे. यात अविराज याने संघाच्या विजय मोलाचे योगदान दिले. रत्नागिरी जिल्हा संघाचा पहिला सामना उस्मानाबाद संघाशी झाला. यात अविराजने २ गडी बाद केले. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा संघाबरोबर झालेल्या सामन्यात त्याने अष्टपैलू खेळी केली. या सामन्यात त्याने ४ विकेटसह १७ चेंडूत ३३ धावा काढल्या. रत्नागिरीचा तिसरा सामना पुण्याच्या डी. वाय. पाटील संघाशी झाला. या सामन्यात अविराजने हॅट्ट्रिकसह पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले.