दुबई - क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे अनेक मार्ग आहेत. शिवाय, विविध रंगतदार घटनांमुळे फलंदाज बाद होतात. असाच प्रकार हैदराबादच्या राशिद खानसोबत घडला. आयपीएलमध्ये मंगळवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना राशिद एकाच चेंडूवर दोनदा बाद झाला.
एकाच चेंडूवर फलंदाज दोनदा बाद..! पाहा व्हिडिओ - rashid khan vs csk news
सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज राशिद खान चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना एकाच चेंडूवर दोनदा बाद झाला. या सामन्यात हैदराबाद संघाला ७ चेंडूत २२ धावांची गरज होती. तेव्हा राशिदने ही करामत केली.

या सामन्यात हैदराबाद संघाला ७ चेंडूत २२ धावांची गरज होती. राशिद उत्तम लयीत होता. चेन्नईचा गोलंदाज शार्दुल ठाकूरला मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याचा पाय स्टम्पला लागला. शिवाय, त्याने खेळलेल्या फटक्यावर लाँग-ऑनवर उभ्या असलेल्या दीपक चहरने झेल घेतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. अंबाटी रायुडू-शेन वॉटसनच्या योगदानामुळे आणि रवींद्र जडेजाच्या आक्रमक फटकेबाजीमुळे चेन्नईला दीडशेपार जाता आले. प्रत्युत्तरात हैदराबादला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. केन विल्यमसनने अर्धशतक झळकावत झुंज दिली, मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. विल्यमसनने ७ चौकारांसह ५७ धावा केल्या. चेन्नईकडून कर्ण शर्मा आणि ब्राव्होने दोन तर, सॅम करन, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.