मुंबई- रणजी ट्रॉफीत गुजरात, बंगाल, कर्नाटक, सौराष्ट्र, आंध्र, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा आणि गोवा या संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर गतविजेता विदर्भ आणि मुंबई, दिल्ली, पंजाबसारखे संघ अंतिम आठमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरले.
उपांत्यपूर्व, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी पाच दिवसाचा खेळ व्हावा म्हणून एक अतिरिक्त दिवस देण्यात आला आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या ८ संघांपैकी ओडिशाला नवव्या फेरीच्या अंतिम दिवसापर्यंत स्थान निश्चित करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली होती.
उपांत्य फेरी पात्र संघ आणि त्यांचे गुण -
- गोवा - ९ सामने ७ विजय, २ अनिर्णीत गुण - ५०
- जम्मू आणि काश्मीर - एलियट ग्रुप ९ सामने ६ विजय १ पराभव आणि २ अनिर्णीत गुण ३९
- ओडिशा - एलियट ग्रुप ९ सामने ५ विजय, २ पराभव आणि २ अनिर्णीत गुण -३८
- गुजरात - ८ सामन्यात ५ विजय ३ अनिर्णीत गुण - ३५
- बंगाल - ८ सामन्यात ४ विजय, १ पराभव आणि ३ अनिर्णीत गुण - ३२
- कर्नाटक - ८ सामने ४ विजय ४ अनिर्णीत गुण -३१
- सौराष्ट्र - ८ सामने ३ विजय, १ पराभव आणि ४ अनिर्णीत गुण - ३१
- आंध्र प्रदेश - ८ सामने ४ विजय २ पराभव आणि २ अनिर्णीत गुण - २७
उपांत्यपूर्वी फेरीचे सामने आणि ठिकाण -
- गुजरात विरुद्ध गोवा - सरदार पटेल स्टेडियम, वलसाड
- बंगाल विरुद्ध ओडिशा - डीआरआयइएमएस मैदान, कटक
- सौराष्ट्र विरुद्ध आंध्र - सीएसआर शर्मा कॉलेज ग्राउंड, ओंगोल
- कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर - सरकार गांधी मेमोरियल सायन्स कॉलेज मैदान, जम्मू