मुंबई- सलामीवीर फलंदाज हार्दिक तामोरेच्या (११३ धावा) शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने मध्य प्रदेशविरूध्दच्या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. तर दुसरीकडे बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्रावर पराभवाचे सावट आहे.
मुंबईने हार्दिकच्या शतकी खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशसमोर ४०८ धावांचे लक्ष ठेवले. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशची २ बाद ४४ धावा अशी अवस्था झाली आहे. अखेरच्या दिवशी विजयासाठी मध्य प्रदेशला तब्बल ३६४ धावांची आवश्यकता आहे. रमीझ खान २७, तर आदित्य श्रीवास्तव १ धावेवर खेळत आहे. मुलानी-जैस्वाल या फिरकी जोडीने प्रत्येकी १-१- गडी बाद केला.
बारामतीमध्ये, महाराष्ट्राने दिलेल्या २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर उत्तराखंडने २ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारली आहे. अखेरच्या दिवशी उत्तराखंडला विजयासाठी अवघ्या १६७ धावांची आवश्यकता आहे. कमल सिंग ४०, तर मयांक मिश्रा १८ धावांवर खेळत आहेत.