गुवाहाटी - रणजी करंडक सामन्यात, महाराष्ट्राने आसामवर २१८ धावांनी विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात चमकदार कामगिरी केली मध्यमगती गोलंदाज आशय पालकर आणि मुकेश चौधरी यांनी. दोघांच्या भेदक माऱ्यासमोर आसामचा दुसरा डाव अवघ्या ७८ धावांमध्ये आटोपला. दरम्यान, दुसऱ्या विजयासह महाराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेच्या एलिट क गटात १५ गुणांची कमाई केली आहे.
पहिल्या डावात आसामने ६९ धावांची आघाडी घेतली होती. तेव्हा दुसऱ्या डावात महाराष्ट्राने जय पांडेच्या शतकी खेळीमुळे आसामसमोर २९७ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, आसामला हे लक्ष्य गाठता आले नाही.
मुकेश आणि आशय यांनी आसामच्या एकाही फलंदाजाला मैदानात जम बसू दिला नाही. या दोघांच्या भेदक माऱ्यासमोर आसामचा दुसरा डाव अवघ्या २९.५ षटकांत ७८ धावांवर गडगडला.