मुंबई- सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सौराष्ट्रने उपांत्य फेरीत गुजरातवर ९२ धावांनी विजय मिळवला. अंतिम फेरीत सौराष्ट्रची भिडत बंगालशी होणार आहे. उपांत्य सामन्यात उनाडकटने १० गडी टिपले.
उपांत्य सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सौराष्ट्रने शेल्डन जॅक्सनच्या शतकी खेळाच्या जोरावर पहिल्या डावात ३०४ धाव्या केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल गुजरातचा संघ पहिल्या डावात २५२ धावांपर्यंत मजल मारू शकला.
दुसऱ्या डावात सौराष्ट्रची अवस्था १५ धावांवर ५ गडी बाद अशी झाली. तेव्हा मधल्या फळीत चेतन सकारियाच्या ४५ धावा, अर्पित वसवडाचे शतक झळकावत संघाचा डाव सावरला. त्यांना चिराग जानीने अर्धशतक झळकावत चांगली साथ दिली. या तिघांच्या खेळीच्या जोरावर सौराष्ट्राला २७४ धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात गुजरातकडून चिंतन गजाने ७ बळी घेतले. सौराष्ट्रने गुजरातसमोर विजयासाठी ३२७ धावांचे आव्हान ठेवले.