मुंबई - स्थानिक क्रिकेटमध्ये खेळाडूंचा कस पाहणारी आणि वरिष्ठ संघात निवड होण्यासाठी महत्वाची मानली जाणारी यंदाची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. ३८ संघांमध्ये ही स्पर्धा ९ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या १३ मार्चपर्यंत चालणार आहे.
हेही वाचा -पाक खेळाडूने ओढले स्वतःच्याच मंडळावर ताशेरे, म्हणाला, 'थट्टा बस करा!'
तब्बल ४१ वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई आणि यंदा या स्पर्धेच्या जेतेपदाच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न पाहणाऱ्या विदर्भ संघांकडे सर्वांचे लक्ष असले तरी चंडीगड या नव्या संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याव्यतिरिक्त विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या कर्नाटकचा संघही बलाढ्य मानला जात आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि युवा खेळाडू पृथ्वी शॉ याच्या सहभागामुळे मुंबईचा संघ अधिक बळकट झाला आहे.