हैदराबाद - रणजी करंडक स्पर्धेच्या आठव्या फेरीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाखेर ९ संघानी विजय मिळवला आहे.
- तामिळनाडू विरुद्ध बडोदा - तामिळनाडूचा १ डाव ५७ धावांनी विजय
- पंजाब विरुद्ध आंध्र प्रदेश - पंजाबचा ४ गडी राखून विजय
- हरियाणा विरुद्ध आसाम - हरियाणाचा ७ गडी राखून विजय
- सर्विसेस विरुद्ध उत्तराखंड - सर्विसेसचा १० गडी राखून विजय
- छत्तीसगड विरुद्ध मिझोराम - छत्तीसगडचा एक डाव ३६५ धावांनी विजय
- मेघालय विरुद्ध सिक्कीम - मेघालयाचा ६६ धावांनी विजय
- त्रिपुरा विरुद्ध जम्मू-काश्मिर - जम्मू काश्मिरचा ३२९ धावांनी विजय
- मनिपूर विरुद्ध पाँडिचेरी - पाँडिचेरीचा २४१ धावांनी विजय
- गोवा विरुद्ध नागालँड - गोवा संघाचा २२९ धावांनी विजय
मुंबई विरुद्ध सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात मुंबईने दुसऱ्या डावात २१२ धावांची लीड घेतली आहे. मुंबईचा पहिला डाव २६२ धावांवर आटोपला. तेव्हा सौराष्ट्रने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ३३५ धावा केल्या. दुसऱ्या डावात मुंबईने ३ बाद २८५ धावा केल्या आहेत. सर्फराज खान (२५) आणि शम्स मुलाणी (६७) नाबाद खेळत आहेत.