हैदराबाद- रणजी करंडक २०१९-२० स्पर्धेच्या सातव्या फेरीला सुरूवात झाली असून आज या फेरीचा दुसरा दिवस होता. मध्य प्रदेशचा गोलंदाज रवी यादव याने रणजी स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या षटकात हॅट्ट्रिक साधली. याशिवाय पावसाने अनेक ठिकाणी खेळवण्यात आलेल्या सामन्यात व्यत्यय आणला.
ग्रुप ए
- बंगाल विरुद्ध दिल्ली -
- कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात बंगालने प्रथम फलंदाजी करताना ३१८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्ली संघाने ६ बाद १९२ धावा केल्या आहेत. दिल्ली १२६ धावांनी पिछाडीवर आहे.
- केरळ विरुद्ध आंध्र प्रदेश -
केरळचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. तेव्हा आंध्र प्रदेशने २५५ धावा करत पहिल्या डावात ९१ धावांची आघाडी मिळवली. - हैदराबाद विरुद्ध राजस्थान -
हैदराबादच्या पहिल्या डावातील १७१ धावांच्या प्रत्युत्तरादाखल राजस्थानचा संघ १३५ धावा करु शकला. दुसऱ्या दिवसाअखेर हैदराबादने दुसऱ्या डावात ६ बाद १०१ धावा केल्या आहेत. - विदर्भ विरुद्ध गुजरात -
विदर्भाचा पहिला डाव १४२ धावांवर आटोपला. तेव्हा गुजरातचा डाव २११ धावांवर आटोपला. विदर्भने दुसऱ्या डावात ४ बाद ८९ धावा केल्या आहेत.