ठाणे -देशातील प्रतिष्ठित मानली जाणारी रणजी क्रिकेट स्पर्धा आता ठाण्यात खेळवली जाणार आहे. तब्बल २२ वर्षांनी ठाण्यातील दादोजी स्टेडियम आता परत एकदा क्रिकेटसाठी सज्ज झाले असून येथील क्रिकेटपटूंना आता सुगीचे दिवस येणार आहेत. या संकुलामध्ये २२ वर्षांपूर्वी रणजी करंडक स्पर्धेचे सामने झाले होते. या नवीन वर्षात २३ वर्षाखालील खेळाडूंमध्ये मुंबई विरुद्ध बंगाल हा चार दिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे.
तब्बल २२ वर्षानंतर ठाण्यात रंगणार रणजी सामना! - Thane ranji match news
भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते मुंबई विरुद्ध बंगाल हा या सामन्याचे उद्घाटन होणार आहे. या सामन्यासाठी क्रीडाप्रेमी तसेच ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते मुंबई विरुद्ध बंगाल या सामन्याचे उद्घाटन होणार आहे. या सामन्यासाठी क्रीडाप्रेमी तसेच ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
क्रिकेटमधील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या सी.के.नायडू चषकमधील क्रिकेट सामना ५ ते ८ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. ठाणे महानगरपालिका व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सामन्याचे आयोजन केले आहे . २३ वर्षाखालील खेळाडूंमध्ये हा चारदिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना पाहता यावा, यासाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.