महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रणजी विजेत्या कर्णधाराचा कोरोनाविरूद्धच्या लढ्याला हातभार

उनाडकटने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. मी आणि माझे कुटुंब पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीमध्ये हातभार लावत आहोत. तसेच स्थानिक गरजूंना आवश्यक ते सहकार्य देत आहोत, असे उनाडकटने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Rani captain jaydev unadkat donated to fight coronavirus
रणजी विजेत्या कर्णधाराची कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उडी

By

Published : Apr 7, 2020, 8:54 PM IST

राजकोट -यंदाच्या रणजी स्पर्धेच्या विजेत्या संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आर्थिक हातभार लावला आहे. उनाडकट आणि त्याच्या कुटुंबाने पीएम केअर फंड आणि गुजरातच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये आपले योगदान दिले.

उनाडकटने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. मी आणि माझे कुटुंब पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हातभार लावत आहोत. तसेच स्थानिक गरजूंना आवश्यक ते सहकार्य देत आहोत, असे उनाडकटने ट्विटमध्ये म्हटले आहे.

मागील काही दिवस आपल्यासाठी खूप आव्हानात्मक होते. ज्यांना आवश्यक गोष्टी पोहोचू शकत नाहीत त्यांच्याबद्दल मला वाईट वाटते. या परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र राहून सकारात्मकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही उनाडकटने म्हटले आहे.

मंगळवारी उनाडकट व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारानही या आपत्तीत मदतीचा हात पुढे केला आहे.जयदेव उनाडकटने नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेत सौराष्ट्र संघाला आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details