कॅन्डी - विश्वविजेता श्रीलंका संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ५५ वर्षीय रणतुंगा यांनी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविली होती. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. रणतुंगा यांचा भाऊ निशांत यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी सचिव पदासाठी निवडणूक लढविली होती.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत अर्जुन रणतुंगा यांचा पराभव - Cricket Board Vice Presidential Election
श्रीलंका बोर्डात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला दूर करण्याच्या इराद्याने त्यांनी ही निवडणूक लढविली होती.
अर्जुन रणतुंगा
श्रीलंका बोर्डात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला दूर करण्याच्या इराद्याने त्यांनी ही निवडणूक लढविली होती. श्रीलंकेच्या मंत्रीमंडळात रणतुंगा हे मंत्री आहेत. ते विश्वचषकापूर्वी श्रीलंकेच्या बोर्डात येऊन कामकाज करु इच्छित होते. रणतुंगा यांचे सहकारी जयंत धर्मदास यांनीदेखील अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविली होती. त्यांचाही पराभव झाला. त्यांचा शम्मी सिल्वा यांनी पराभव केला.