जयपूर - इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. १२ वर्षात पंजाबने पहिल्यांदा राजस्थानला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविले. हा सामना जास्त चर्चेत आहे ते जोस बटलर याला आर. अश्विनने मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे. अश्विनच्या या प्रकारामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. यात भर म्हणून आयपीएलचे चेअरमन राजीव शुल्का यांची प्रतिक्रिया आली आहे.
आयपीएल चेअरमन शुक्ला यांचा खुलासा, मंकड पद्धतीने बाद न करण्याचा झाला होता निर्णय - चेअरमन राजीव शुल्का
विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यासोबत आयपीएलमधील सर्व कर्णधार आणि मॅच रेफरींची एक बैठक झाली होती. त्यात कोणत्याही फलंदाजास मंकड पद्धतीने बाद करता येणार नसल्याचा निर्णय झाला होता.
राजीव शुक्ला
आयपीएलचे चेअरमन शुक्ला म्हणाले, विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यासोबत आयपीएलमधील सर्व कर्णधार आणि मॅच रेफरींची एक बैठक झाली होती. त्यात कोणत्याही फलंदाजास मंकड पद्धतीने बाद करता येणार नसल्याचा निर्णय झाला होता. कोलकाता येथे झालेल्या या बैठकीस मीही उपस्थित होतो.