जयपूर- सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. हैदराबादने राजस्थानपुढे १६१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानने हे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
१६१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या राजस्थानकडून रहाणे आणि लियाम लिविंगस्टोन यांनी ७८ धावांची मजबूत सलामी दिली. अजिंक्य रहाणे ३४ चेंडूत ३९ धावा काढून बाद झाला. लियामने ४४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर संजू सॅमसनने ताबडतोब नाबाद ४८ धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथने केवळ २२ धावांचे योगदान दिले. शाकिब उल हसन, राशिद खान आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने मनीष पांडे ६१ तर डेव्हिड वॉर्नर ३७ धावांच्या जोरावर राजस्थानपुढे विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादने निर्धारित २० षटकात ८ बाद १६० धावांपर्यंत मजल मारली.
राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाकडून डेव्हिड वॉर्नर ने ३२ चेंडूत ३७ धावा केल्या. विशेष म्हणजे एकाही चौकार किंवा षटकाराचा समावेश नव्हता. वन डाऊन पोझिशनवर खेळण्यासाठी आलेल्या मनीष पांडेने ३६ चेंडूत ६१ धावांची खेळी साकारली. त्यात ९ चौकारांचा समावेश होता. या दोघांना वगळता राजस्थानच्या इतर कोणत्याच फलंदाजाल छाप टाकता आली नाही.
विजय शंकर ८ शकीब उल हसन ९ दीपक हुडा ०, ऋध्दीमान साहा ५, राशिद खान १७ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून ओशाने थोमस, श्रेयस गोपाल, वरुण अॅरोन आणि जयदेव उनाडकटने प्रत्येकी २ बळी घेतले. राजस्थानच्या सर्वच गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.