जयपूर - आयपीएलच्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने निर्धारीत २० षटकांमध्ये ४ गडी गमावत १८४ धावा केल्या. राजस्थानकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक २ गडी माघारी धाडले. तर कृष्णप्पा आणि धवल यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.
RR vs KXIP : पंजाबचा राजस्थानवर 14 धावांनी विजय
पंजाबकडून ख्रिस गेलने केली ७९ धावांची शानदार खेळी केली.
पंजाबकडून ख्रिस गेलने ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ७९ धावांची शानदार खेळी केली. तर सरफराज खानने २९ चेंडूत नाबाद ४६ धावा करत पंजाबची धावसंख्या दिडशेपार नेली.
पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ निर्धारीत २० षटकांमध्ये १७० धावा करु शकला. राजस्थानकडून जोस बटलरने ४३ चेंडूत ६९ धावांची खेळी करत विजयाच्या आशा जिवंत राखल्या होत्या. मात्र तो बाद झाल्यानंतर ईतर फलंदाजांना खेळपट्टीवर जास्त वेळ टीकता न आल्याने राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागाला. पंजाबसाठी सॅम करन, मुजीब उर रहमान आणि अंकित राजपूत यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.