जयपूर -आयपीएलमध्ये आज चौदाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांनीआतापर्यंत या मोसमात ३ सामने खेळले आहेत. मात्र, एकाही सामन्यात त्यांना विजयी होता आले नाही. त्यामुळे हा सामना जिंकून विजयाचे खाते उघडण्यासाठी दोन्ही संघ उत्सूक असणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह क्रिकेट मैदानावर आज रात्री ८ वाजता खेळविण्यात येणार आहे.
सलग पराभवांमुळे गुणतालिकेत राजस्थान सातव्या तर बंगळुरू आठव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघात स्टार खेळाडूंचा भरणा असूनही दोन्ही संघाना सामना जिंकण्यास यश येत नसल्याने संघमालकही हताश आहेत.
Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore
बंगळुरूची फलंदाजीची मदार कोहली- डिव्हिलियर्सलर तर गोलंदाजीची जबाबदारी उमेश यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्यावर असेल. दुसरीकडे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानकडे जोस बटलर, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स यासारखे मात्तबर खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात कोण विजयाचे खाते उघडणार यावर सर्वांची नजर असेल.
राजस्थान रॉयल्स -अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गॉथम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमान बिर्ला, एस मिथून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ, जो स बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोधी, जयदेव उनाडकट, वरुण ऍरॉन, ओशान थॉमस, शशांक सिंग, लियाम लिव्हिनस्टोन, शुभम राजाने, मनन वोहरा, ऍश्टन टर्नर, रियान पराग.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु -विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक) हेन्रिच क्लासिन (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज,मोईन अली, कॉलिन डी ग्रॅण्डहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.