दिल्ली - आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना खेळतील. गुणतालिकेत पहिल्या २ संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्लीला ही शेवटची संधी असणार आहे. तर प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहायचे असल्यास या सामन्यात राजस्थानला विजय मिळवणे आवश्यक आहे. रॉयल्सने या सामन्यात विजय मिळवला तरी प्लेऑफसाठी त्यांना जर-तरच्या समीकरणावर अवलंबून रहावे लागणार आहे. हा सामना फिरोजशाह कोटला मैदानावर आज सायंकाळी ४ वाजता खेळला जाणार आहे.
राजस्थानच्या फलंदाजीची जबाबदारी अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसनवर असणार आहे. तर गोलंदाजीची भीस्त जयदेव उनाडकट, वरुण ऍरॉन आणि श्रेयस गोपाळ यांच्यावर असेल. जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि स्टीव्ह स्मिथ यासांरखे स्टार खेळाडू मायदेशी परतल्याने राजस्थानच्याच्या चिंता वाढल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थानची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नसल्याने संघाला १३ पैकी ७ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे.
दिल्लीच्या फलंदाजीचा विचार केला तर, कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवन तुफान फॉर्मात आहेत. मात्र या सामन्यात आयपीएलच्या या सत्रातीस सर्वाधिक यशस्वी गोलंदाज कॅगिसो रबाडाची साथ दिल्लीला मिळणार नाहीय. दुखापतीमुळे रबाडा मायदेशी परतलाय. दिल्लीने आतापर्यंत १३ पैकी ८ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे.
राजस्थान रॉयल्स - अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गॉथम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमान बिर्ला, एस मिथून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, इश सोधी, जयदेव उनाडकट, वरुण ऍरॉन, ओशान थॉमस, शशांक सिंग, लियाम लिव्हिनस्टोन, शुभम राजाने, मनन वोहरा, ऍश्टन टर्नर, रियान पराग.
दिल्ली कॅपिटल्स - श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, हर्षल पटेल, इशांत शर्मा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारु अयप्पा.