नागपूर -आयपीएलचा तेरावा हंगाम २९ मार्चपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, या स्पर्धेचे पहिले विजेतेपद जिंकलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने नागपूरमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. २ ते ७ मार्च दरम्यान तळेगाव येथील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट येथे हे सराव शिबीर होणार आहे. गुवाहाटी येथे तीन दिवसांच्या शिबिरानंतर नागपुरातील वातावरणात हे शिबीर घेण्यात येणार आहे.
हेही वाचा -खेलो इंडिया..! द्युतीला दुसरे सुवर्ण तर, मुंबईच्या कीर्ती भोईटेला रौप्यपदक
गुवाहाटी येथील सराव शिबिराचा भाग असलेले रॉबिन उथप्पा, अनुज रावत, मयांक मार्कंडे, आकाश सिंग हे खेळाडू नागपूर येथील शिबिरात भाग घेणार आहेत. त्यांच्यासह वरुण आरोन, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल हे खेळाडूही सहभागी होतील.
'नागपूर येथील शिबीर हे घरगुती आणि चांगले प्रशिक्षण मिळवण्याची एक उत्तम संधी आहे', असे राजस्थान रॉयल्स क्रिकेटचे मुख्य झुबीन भरूचा यांनी सांगितले. या हंगामाचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार असून १७ मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.