नवी दिल्ली -किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल्सने चार गडी राखून विजय मिळवला. २२४ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करत राजस्थानने मोठा विक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
आयपीएल २०२० : राजस्थान रॉयल्सने मोडला १२ वर्षांपूर्वीचा विक्रम - rajasthan royals vs punjab news
किंग्ज इलेव्हन पंजाबवर मिळवलेल्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सने स्वत:चा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
हा विक्रम करताना त्यांनी स्वत:चा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. २००८च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल्सने २१५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. तर, २०१७मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स यांच्यात दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने २०९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.
इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील ९वा सामना रविवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात पार पडला. शारजाह येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थान संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ फलंदाज गमावत २२३ धावा केल्या. पंजाबचे २२४ धावांचे आव्हान राजस्थानने ६ फलंदाज गमावत केवळ १९.३ षटकांत पूर्ण केले.