दुबई- अमेरिका आणि युनायटेड अरब अमीरात (युएई) यांच्यातील पहिला टी-ट्वेन्टी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. अमेरिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा केल्या होत्या.
युएईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयसीसी अकादमी, दुबई येथे झालेल्या या सामन्यात पावसामूळे व्यत्ययामुळे १५ षटकांचा सामना करण्यात आला. अमेरिकेच्या संघाने चांगली फलंदाजी करताना स्टीव्ह टेलरच्या ३९ चेंडूत ७२ धावांच्या खेळीच्या बळावर १५२ धावा केल्या.