महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : 'ट्रेनिंग पँट' घालून फलंदाजीला उतरला मुंबईचा फलंदाज! - quinton de kock vs kkr news

मुंबईच्या फलंदाजीच्या वेळी डी-कॉक सरावादरम्यानची पँट (ट्रेनिंग पँट) घालून फलंदाजीला उतरला. इतर सहकाऱ्यांनी त्याला ही गोष्ट लक्षात आणून देईपर्यंत उशीर झाला होता. त्यानेही ही पँट दिसू नये म्हणून आपले टी-शर्ट खाली केले.

quinton de kock playing in his training pants against kkr in ipl 2020
VIDEO : 'ट्रेंनिग पँट' घालून फलंदाजीला उतरला मुंबईचा फलंदाज!

By

Published : Oct 17, 2020, 5:10 PM IST

अबुधाबी - आयपीएलच्या ३२व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा आठ गडी राखून सहज पराभव केला. कोलकाताने मुंबईसमोर विजयासाठी १४९ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. सलामीवीर क्विंटन डी-कॉकच्या तडाखेबंद आणि नाबाद ७८ धावांच्या खेळीमुळे मुंबईने हे आव्हान सहज पेलले. या लढतीसाठी सामनावीर ठरलेल्या डी-कॉकबाबत एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली.

मुंबईच्या फलंदाजीच्या वेळी डी-कॉक सरावादरम्यानची पँट (ट्रेनिंग पँट) घालून फलंदाजीला उतरला. इतर सहकाऱ्यांनी त्याला ही गोष्ट लक्षात आणून देईपर्यंत उशीर झाला होता. त्यानेही ही पँट दिसू नये म्हणून आपले टी-शर्ट खाली केले. हा प्रकार पाहून त्याचा जोडीदार-सलामीवीर रोहित शर्माला हसू आवरले नाही. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या सामन्यात 'ट्रेनिंग पँट' घालून फलंदाजी करणे कोणालाही शक्य झालेले नाही.

आयपीएल तेरावा हंगाम अर्धा संपला असून स्पर्धेने उत्तरार्धाकडे आगेकूच केली आहे. पहिल्या चार स्थानासाठी आठ संघात चुरस निर्माण होणार आहे. पण सद्या मुंबईचा संघ अव्वलस्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा संघ आहे. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे बंगळुरू आणि कोलकाताचा संघ आहे. पाचव्या स्थानावर हैदराबादचा संघ आहे. चेन्नई सहाव्या स्थानी आहे. राजस्थानचा संघ सातव्या तर पंजाबचा संघ तळाशी आठव्या स्थानी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details