जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएलमध्ये डी कॉक हा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.
हेही वाचा -क्रीडाविषयक समितीमधून सचिन आणि आनंदला केंद्रसरकारने काढले बाहेर!
'डी कॉक हा एक विलक्षण खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत आहे. आणि त्यामुळेत तो सध्या जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक बनला आहे', असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा (सीएसए) संचालक ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे.