पुणे- दक्षिण आफ्रिके विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने २०३ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर उद्या १० ऑक्टोबरपासून रंगणार आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला ३ आव्हानांना समोरे जावे लागणार आहे.
पहिले आव्हान दक्षिण आफ्रिकेचा संघ असून दुसरे आव्हान गहुंजे स्टेडियमचे प्रमुख क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी तयार केलेली खेळपट्टी आणि तिसरे आव्हान हे पावसाचे आहे.
महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यातही पावसाने उपस्थिती दर्शवल्याने दुसरा सामना होणार की नाही यावर सशांकता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात पावसाची दाट शक्यता आहे. यावेळी तापमान 21 ते 31 डीग्री एवढे असेल, असेही म्हटले जात आहे. पावसामुळे कसोटी रद्द झाली तर दोन्ही संघांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने मोठा फटका बसू शकतो.