राजकोट - भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढ्यात योगदान दिले आहे. पुजाराने पंतप्रधान सहायता निधीत मदत देण्याचे जाहीर केले. त्याने ट्विटरवरून ही माहिती दिली.
कोरोना : चेतेश्वर पुजाराने दिला मदतीचा हात
मी आणि माझ्या कुटुंबाने पंतप्रधान सहायता निधी आणि गुजरात मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मदत दिली आहे. आशा करतो, की तुम्हीही हातभार लावाल. आरोग्य कर्मचारी, पोलीस, महिला आणि या कठीण काळात देश आणि मानवतेसाठी परिश्रम घेत असलेल्या सर्व लोकांचे आभार, असे पुजाराने ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुजारा व्यतिरिक्त इतर अनेक क्रिकेटपटूंनीही कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदतीचा हात पुढे केला आहे.