मुंबई - पाकिस्तान सुपर लीगच्या प्ले ऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. पेशावर झाल्मी विरुद्ध लाहोर कलंदर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यादरम्यान गमतीदार किस्सा पाहायला मिळाला.
पेशावर झाल्मी संघाने दिलेल्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी लाहोरचे कलंदर मैदानात उतरले. त्यांची सुरुवात देखील चांगली झाली. १२व्या षटकात मोहम्मद इमरानने पहिला चेंडू टाकला. यानंतर सामना अचानक थांबवण्यात आला आणि कलंदरचा फलंदाज मोहम्मद हाफीज अचानक ड्रेसिंग रुमच्या दिशेने धावत सुटला. नेमके काय घडले हे कुणालाच कळले नाही.
या ब्रेकच्या कालावधीत पेशावर संघाचे वहाब रियाज, इमाम उल हक आणि शोएब मलिक आपापसात चर्चा करत होते. तेव्हा स्पाईक कॅमेरा त्यांच्याजवळ थांबवण्यात आला. तेव्हा समालोचक रमीझ राजा यांनी त्यांच्याशी गप्पा मारण्यास सुरूवात केली. याच चर्चेत इमामने सामना थांबण्यामागचे कारण सांगितले.