कराची- कोरोना विषाणूच्या वाढत्या भीतीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुपर लीग स्पर्धा, प्ले ऑफ फेरीत थांबवण्याचा निर्णय घेतला. या लीगमध्ये इंग्लंडचा खेळाडू अॅलेक्स हेल्सला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा रंगली. यामुळे पीसीबीने सुपर लीमधील खेळाडू, सहायक कर्मचारी, सामनाधिकारी, प्रसारक आणि संघ मालक असे एकूण १२८ जणांची कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पीसीबीने आज (गुरुवार) जाहीर केला.
पीसीबीने कोरोना चाचणी झालेल्या १२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे जाहीर केले आहे. याविषयी पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी सांगितले की, 'पाकिस्तान सुपर लीग आणि पीसीबी यांच्या प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न होता. ही स्पर्धा संपेपर्यंत पाकिस्तानमध्येच थांबण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडू, सहायक कर्मचारी, प्रसारक आणि सामनाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आज त्याचा अहवाल आला असून सर्व निगेटिव्ह आहेत.'