लंडन -मेरीलबॉन क्रिकेट क्लबने (एमसीसी) श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे क्लबचे सर्व उपक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. एका अहवालानुसार 24 जून रोजी एजीएमच्या प्रस्तावावर मते दिली जातील.
माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराचा कार्यकाळ लांबणार?
गतवर्षी 1 ऑक्टोबरला संगकाराने क्लबचा कार्यभार स्वीकारला होता. यासह तो ब्रिटिश नसलेलला एमसीसीचा पहिला अध्यक्ष ठरला होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तान दौर्यावर आलेल्या एमसीसी एकादशमध्ये संगकाराही होता.

24 जून रोजी होणाऱ्या एजीएममध्ये हा क्लब नवीन लाइफ मेंबरशिपद्वारे हा निधी गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये कोरोनामुळे सर्व प्रकारच्या क्रियाकलाप 1 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.