महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, पृथ्वी शॉ सराव सामन्यातून बाहेर - पृथ्वी शॉ लेटेस्ट न्यूज

'न्यूझीलंड दौर्‍यात होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या भाग घेण्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल', असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले. ३ जानेवारीला मुंबई आणि कर्नाटक यांच्यात खेळल्या गेलेल्या रणजी करंडक सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Prithvi Shaw out of practice match against New Zealand tour
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, पृथ्वी शॉ सराव सामन्यातून बाहेर

By

Published : Jan 8, 2020, 8:03 AM IST

Updated : Jan 8, 2020, 8:56 AM IST

मुंबई -भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आगामी न्यूझीलंड दौऱ्यातील सराव सामन्यांमध्ये भारत 'अ' संघाकडून खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे शॉला मालिकेमधून माघार घ्यावी लागली आहे.

हेही वाचा -नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा 'महाराष्ट्र केसरी'.. लातूरच्या शेळकेवर मात

'न्यूझीलंड दौर्‍यात होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या भाग घेण्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल', असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले. ३ जानेवारीला मुंबई आणि कर्नाटक यांच्यात खेळल्या गेलेल्या रणजी करंडक सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीच्या खांद्याला दुखापत झाली होती. मुंबईला या सामन्यात कर्नाटककडून पराभव स्वीकारावा लागला. पृथ्वीची कमतरता मुंबईला जाणवली होती.

पृथ्वी सध्या बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत असून न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याचा भारत 'अ' संघात समावेश करण्यात आला होता.

Last Updated : Jan 8, 2020, 8:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details