मेलबर्न - आई झाल्यानंतर करिअर सोडावे लागणाऱ्या खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने आई होणाऱ्या क्रिकेटपटूंना एक वर्षाची सुट्टी आणि त्या काळातील वेतन देखील देण्यास सुरुवात केली आहे.
आई झाल्यानंतर क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास महिला खेळाडूंना एक वर्षापेक्षा अधिक काळ खेळापासून दूर रहावे लागते. अनेक महिला खेळाडूंना तर परत क्रीडा क्षेत्रात परतणे शक्य होत नाही. यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेटने नवा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट त्या निर्णयानुसार, आई होणाऱ्या क्रिकेटपटूंना एक वर्षाची सुट्टी आणि त्या काळातील वेतन देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर बाळाचा जन्म होण्याआधीपर्यंत ती क्रिकेट न खेळण्यासंदर्भातील निर्णय देखील घेऊ शकते.