रांची -आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत दमदार विजय मिळवल्यानंतर, टीम इंडिया तिसऱ्या कसोटीसाठी परत एकदा सज्ज झाली आहे. १९ ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून रांची येथे सुरू होणाऱ्या शेवटच्या कसोटीत आफ्रिकेला पाणी पाजण्यासाठी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून येतोय.
हेही वाचा -IPL 2020 : पहिल्यांदा घडलं! विराटची टीम आरसीबीत 'सुंदर' महिलेचा समावेश
आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताने २-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यातही आफ्रिकेचा सुपडा साफ करण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये टीम इंडिया चांगला सराव करत असून बीसीसीआयने त्यांच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
'तुम्ही किती आणि कसा सराव करता हे महत्वाचे आहे. मला वाटते की, खेळपट्टी ही कठीण असल्याने फिरकीसाठी आश्वासक असेल. त्यामुळे भारताविरूद्ध रिव्हर्स सिंग आणि फिरकी खेळवण्याचा मानस राहिल', असे आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने म्हटले आहे.