नवी दिल्ली -भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटपासून २ महिने विश्रांती घेतल्यानंतर नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ३८ वर्षीय धोनी पॅराशूट रेजिमेंटच्या (१०६ पॅरा टीए बटालियन) प्रादेशिक सेनेमध्ये लेफ्टनंट कर्नलची पोस्ट सांभाळणार आहे. धोनी ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण घेणार असल्याची माहिती भारतीय सैन्याचे जनसंपर्क अधिकारी मोहीत वैष्णव यांनी दिली.
धोनी ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत घेणार सैन्य प्रशिक्षण - मोहीत वैष्णव - ex indian cricket captain ms dhoni
मानद लेफ्टनंट कर्नल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण घेणार असून लेह भागात सैन्य प्रशिक्षण मिळण्याचीही धोनीने परवानगी मागीतली आहे. त्यावर सैन्य प्रशासन विचारत करत असून लवकरच आपल्याला कळू शकेल.
सेना जनसंपर्क अधिकारी मोहित वैष्णव
मोहीत वैष्णव म्हणाले, "महेंद्रसिंह धोनीला भारतीय सैन्यात प्रशिक्षणासाठी परवानगी दिल्यांनतर, आता ते ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत पेट्रोलिंग, गार्ड ड्युटी आणि पोस्ट ड्युटी या पदांचे प्रशिक्षण घेणार आहे."
तसेच धोनीने लेह भागात प्रशिक्षण मिळण्याची मागणी केली होती, त्यावर मोहीत म्हणाले, त्याचा प्रस्ताव सैन्य प्रशासनाकडे आले आहे. प्रशासन वेळापत्रक तयार करत असून लवकरच आपल्याला कळू शकेल.