मुंबई- अनेक प्रकरणात चर्चेत असलेली मॉडेल पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाकिस्तानने एका जाहिरातीत भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचा डुप्लिकेट वापरुन आक्षेपार्ह जाहिरात तयार केली होती. त्या पाकिस्तानी जाहिरातीला 'माझं उत्तर असं' लिहित तिने एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे.
VIDEO : पूनम पांडेने पाकिस्तानच्या 'त्या' जाहिरातीची 'अशी' उडवली खिल्ली - pakistan
मॉडेल पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं एका व्हिडिओद्वारे पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
नेमके काय आहे व्हिडिओत -
पूनम पांडेने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये ती चहा पीत असून, काही वेळाने ती आपले अंतर्वस्त्र काढून दाखवते. तिच्या या व्हिडिओमधून तिनं पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानच्या कोणत्या जाहिरातीला दिलं पूनमने उत्तर -
भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचा डुप्लिकेट घेऊन विश्वकरंडक 2019 साठी पाकिस्तानने बनवलेली जाहिरात चर्चेत आली. या जाहिराती बद्दल भारतीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, निषेध केला आहे. पूनम पांडे हिने ही जाहिरात पाहिल्यावर आपला राग व्यक्त केला. मात्र, तिने राग व्यक्त करण्यासाठी आगळी-वेगळी पद्धत अवलंबली. तिनं पाकिस्तानला 'डबल डी ब्रा' मधून चहा पिण्याचा सल्ला दिला आहे.