नवी दिल्ली - भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे मानधनाऐवजी आता अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर हिला संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा -फेडररने चाहत्यांच्या विनंतीवर बदलला प्रोफाइल फोटो; तुम्हीही म्हणाल क्या बात!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या सामन्यातील पहिला सामना बुधवारी बडोदा येथे रंगणार आहे. तत्पूर्वी, स्मृतीला रविवारी सरावादरम्यान, हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे तिला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. स्मृती मानधना लयीत असल्याने, तिच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. मागील १८ सामन्यात खेळताना स्मृतीने ६७.८६ च्या सरासरीने १०१८ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.