नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने त्याच्या जुन्या जॅकेटचा फोटो शेअर केला आहे. हे जॅकेट १९९८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यानचे आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मात देत विजेतेपद पटकावले होते.
रिकी पाँटिंगने शेअर केला जुन्या जॅकेटचा फोटो... वाचा खास आठवण - ponting jacket latest news
ट्विटरवर हा फोटो शेअर करताना पाँटिंगने म्हटले, “मला १९९८च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील जुने जॅकेट सापडले आहे. आम्ही चांगले प्रदर्शन केले नव्हते. दक्षिण आफ्रिकेने आम्हाला एकतर्फी पराभूत केले.”
क्वालालंपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला चार विकेट्सने मात देत सुवर्णपदक जिंकले होते. पाँटिंगच्या जॅकेटवर त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ट्विटरवर हा फोटो शेअर करताना पाँटिंगने म्हटले, “मला १९९८च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील जुने जॅकेट सापडले आहे. आम्ही चांगले प्रदर्शन केले नव्हते. दक्षिण आफ्रिकेने आम्हाला एकतर्फी पराभूत केले.”
या स्पर्धेनंतर राष्ट्रकुल खेळामध्ये क्रिकेटचा कधीच समावेश करण्यात आला नाही.