मेलबर्न - कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. या व्हायरसच्या उद्रेकामुळे क्रीडाविश्वातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यामुळे सध्याचे आणि माजी क्रिकेटपटू सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या एका वेगवान षटकाची आठवण काढली आहे.
शोएब अख्तरचे ‘ते’ षटक...पाँटिगच्या अजूनही स्मरणात - रिकी पाँटिग लेटेस्ट न्यूज
पॉन्टिंगने ट्विटरवर या षटकाचा व्हिडिओ पोस्ट केला. “फ्लिंटॉफने फेकलेले सर्वात वेगवान षटक, ज्याचा मला सामना करावा लागला. त्यानंतर शोएब अख्तरने टाकलेले षटक हे माझ्या कारकीर्दीतील सर्वात वेगवान षटक होते.”, असे पाँटिगने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

पाँटिगने आपल्या ट्विटमध्ये जस्टिन लँगरचाही उल्लेख केला आहे. त्याने यापूर्वी असे म्हटले होते, की एजबॅस्टन येथील अॅशेस कसोटी सामन्यात अँड्र्यू फ्लिंटॉफचे जादुई षटक 'सर्वोत्कृष्ट षटक' होते. या सामन्यात इंग्लंडने दोन धावांनी थरारक विजय मिळवला होता.