काबुल - अफगाणिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या प्रस्तावित मालिकेसाठी १९ सदस्यीय संघात ८ नवीन चेहर्यांचा समावेश केला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) गुरुवारी ही माहिती दिली. एका अहवालानुसार अफगाणिस्तानच्या या संघातील आठ नव्या चेहर्यांमध्ये अब्दुल मलिक, मुनीर अहमद काकर, शाहिदुल्ला कामस, बहिरशाह मोहबूब, फजल हक फारुकी, सय्यद अहमद शिरजाद, सलीम सफी आणि झिया उर रहमान अकबर यांची नावे समाविष्ट आहेत.
एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राशिद खानदेखील या मालिकेत समावेश होऊ शकतो. राशिद सध्या कराचीमध्ये असून पाकिस्तान सुपर लीगची तयारी करत आहे.
अफगाणिस्तान संघ पुढीलप्रमाणे -